Pune Metro : पुण्यात भुयारी मेट्रो धावणार, अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती
Pune MetroSaam Tv

Pune Metro : पुण्यात भुयारी मेट्रो धावणार, अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

पुणे मेट्रो सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वनाज ते गरवारे महाविद्यालय मेट्रोचं (Pune Metro) उदघाटन केलं होतं. पुण्यात मेट्रोच्या दोन मोठ्या मार्गचे काम अंतिम टप्प्यात आहे. वनाज ते रामवाडी असा पहिला मार्ग आहे. तर निगडी ते स्वारगेट दुसरा मार्ग आहे. या दोन्ही मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आलंय. मात्र शिवाजीनगर ते स्वारगेट हा टप्पा भुयारी मार्ग आहे. यातील आज स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गाच्या बोगद्याच्या (tunnel) शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.

Pune Metro
असं कुठं असतंय व्हय! ८ धावांवर अख्खा संघ गारद, दुसऱ्या ओव्हरमध्येच खेळ खल्लास!

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास TBM मुळा - २ ने बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर ब्रेक थ्रू करण्यात यश मिळवलं. त्यामुळे आता लवकरच पुणेकरांना भुयारी मेट्रो मधून प्रवास करण्यास मिळणार आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत भुयारी मार्गातून मेट्रो धावेल, असा विश्वास पुणे मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिला आहे.

Pune Metro
Dance Deewane Juniors : शिल्पा शेट्टी आणि नोरा फतेहीची जुगलबंदी ; कोणी मारली बाजी ?

पुण्याची वाहतूक व्यवस्था पाहता मेट्रो लवकर सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे महामेट्रोकडून पुण्यात १९ किलोमीटरपर्यंत काम सुरू आहे. पुण्याची वाहतूक व्यवस्थेत मेट्रो आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी फुटणार आहे. महामेट्रोकडून सुरू केलेल्या वनाज ते गरवारे मेट्रोला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता पुणेकरांच्या दृष्टीने मेट्रो सुरू होणं गरजेचं आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com