Pune Metro Video: पुण्यात दोन मेट्रो अचानक समोरासमोर आल्या; प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ, पुढे काय घडलं?

Pune Metro Video: ट्रॅकवर एक मेट्रो उभी असताना चक्क दुसरी मेट्रो त्याच ट्रॅकवर समोरून आल्याचा प्रकार घडला आहे.
Pune Metro Video
Pune Metro VideoSaam tv

Pune Metro News In Marathi

पुणे मेट्रो नेहमी चर्चेत असते. हीच पुणे मेट्रो पुन्हा नागरिकांमध्ये पुन्हा चर्चेत आली आहे. ट्रॅकवर एक मेट्रो उभी असताना चक्क दुसरी मेट्रो त्याच ट्रॅकवर समोरून आल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्रवाशांमुळे गोंधळच उडाला, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Pune Latest News)

या व्हिडिओतील व्यक्तीचं नाव निलेश निकम आहे. या निलेश निकम यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. ही घटना पुण्यातील शिवाजी नगरची आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही मेट्रो एकाच ट्रॅकवर दिसत आहे. यापैकी एक मेट्रो बंद पडली आहे. तर दुसरी मेट्रो त्याच ट्रॅकवर आली आहे.

मेट्रो सुसाट धावत होती. याचदरम्यान चालकानं अचानक ब्रेक मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पुणे प्रशानसाना भोंगळ कारभार समोर आला आहे, असा आरोप निलेश निकम यांनी केला आहे.

Pune Metro Video
Dhangar Aarakshan Andolan : धनगर आरक्षणासाठीच्या उपाेषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

तत्पूर्वी, या व्हायरल व्हिडिओनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. खरंच पुण्यात दोन मेट्रो एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्या होत्या का? नेमकं पुणे मेट्रो काय घडलं? यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे मेट्रोच्या या व्हायरल व्हिडिओवर पुणे मेट्रो प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं आहे. मेट्रोसंबंधी सर्व माहिती चुकीची आहे. या दोन्ही मेट्रोमध्ये प्रवासी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या दोन्ही मेट्रो ट्रॅकवर एकाच ट्रॅकवर नव्हत्या, तर वेगवेगळ्या ट्रॅकवर होत्या. तसेच या दोन्ही मेट्रोची ट्रायल सुरू होती, असं पुणे मेट्रोच्या प्रशासनानं म्हटलं आहे.

Pune Metro Video
Biker Was Dragged up to 30 Feet: बसने दुचाकीस्वाराला ३० फुटांपर्यंत फरपटत नेलं; अपघातात तरुणाचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतही दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्या होत्या. सीएसएमटी स्टेशनवर हा प्रकार घडल्याचाही प्रकार घडला होता. या घटनेत दोन्ही रेल्वे एकाच ट्रॅकवर आल्याचा प्रकार समोर आला होता. पण त्यावेळी सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com