Pune MNS : पुणे मनसेत अंतर्गत वाद; बड्या नेत्याच्या हकालपट्टीची मागणी, पदाधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट

निलेश माझिरे यांच्या हकालपट्टीनंतर पुण्यातील मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर बाबू वागस्कर हटाव पुण्यातील मनसे वाचवा असं कॅम्पिंग सुरू केलं आहे.
MNS Pune Nilesh Mazire
MNS Pune Nilesh Mazire Saam Tv

Pune MNS News : गेल्या काही दिवसांपासून पुणे मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर माझिरे यांनी जवळपास ४०० पदाधिकाऱ्यांसह पक्षाला जय महाराष्ट्र केला. दरम्यान, माझिरे यांच्यानंतर आता आखणी एका बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी पुणे मनसेतून केली जात आहे.  (Latest Marathi News)

MNS Pune Nilesh Mazire
CM शिंदेंच्या फोननंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट; सीमावादावर केलं मोठं भाष्य

निलेश माझिरे यांच्या हकालपट्टीनंतर पुण्यातील मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर बाबू वागस्कर हटाव पुण्यातील मनसे वाचवा असं कॅम्पिंग सुरू केलं आहे. त्यामुळे पुणे मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी माझा वाद नाही किंवा त्यांच्यावर माझी नाराजी देखील नाही, असं माझिरे यांनी स्पष्ट केलं आहे.

माझा वाद हा माझ्या विठ्ठलाच्या भोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे. मी लवकरच १५० ते २०० कार्यकर्त्यांसह शिवतीर्थ येथे जाऊन राज साहेबांची भेट घेणार आहे. साहेबांनी संधी दिल्यास मी पक्षात पुन्हा काम करेन, अशी प्रतिक्रिया माझिरे यांनी दिली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेले माझिरे हे लवकरच स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

MNS Pune Nilesh Mazire
Pune News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला, मनसेने पुण्यात कर्नाटकच्या बसला काळं फासलं

मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातील अंतर्गत कलहाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या ननंतर आता निलेश माझिरे यांनी देखील 'बाबू वागस्कर हटाव, मनसे बचाव' अशी भूमिका घेतली असून सोशल मीडियावर असं कॅम्पिंग सुरू केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झाले आहे. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून ते कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहे. मात्र, एकीकडे राज ठाकरे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचे काम करीत असताना दुसरीकडे पुणे मनसेत सुरू असलेला अंतर्गत वाद ते आता कसा सोडणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com