धक्कादायक! 'एमपीएससी' करणाऱ्या आणखी एका तरुणाने संपविली जीवनयात्रा; पुण्यातील घटना

एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
pune crime news
pune crime newssaam tv

सचिन जाधव

Pune Crime News : पुणे (Pune) शहरात राज्यभरातील तरुण एमपीएससीची परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. अशाच एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. त्रिभुवन कावले (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

pune crime news
Video | महिलांच्या शौचालयात डोकावून पाहणाऱ्याला अटक; IIT Bombay मधील धक्कादायक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिभुवन कावले हा जानेवारी २०२१ पासून पुण्यात राहत होता. तो मुळचा जालन्याचा रहिवाशी आहे. पुण्यात तो आपल्या मित्रांसोबत राहत होता. मंगळवारी दुपारी त्याच्या राहत्या खोलीत तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्रिभुवनने नैराश्यातून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

pune crime news
Pune | खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून शासकीय अधिकाऱ्याने संपविले जीवन

दरम्यान, त्रिभुवन कावले या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्रिभुवनने नैराश्याने पाऊल उचलले असून याला कोणी जबाबदार नाही, असे चिठ्ठीत नमूद आहे. या घटने प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com