मुसळधार पावसाने मुळशीतील जनजीवन विस्कळीत; भातपिकांच नुकसान

भात हेच आमचं एकमेव पीक आहे. तेच वाहून गेलं तर खायचं काय ?
मुसळधार पावसाने मुळशीतील जनजीवन विस्कळीत; भातपिकांच नुकसान
मुसळधार पावसाने मुळशीतील जनजीवन विस्कळीत; भातपिकांच नुकसान Saam tv news

दिलीप कांबळे

मावळ (Maval) : मुळशी तालुक्यात (Mulshi taluka) गेले आठ दिवस झाले मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन उध्वस्त झालेली आहे.नाल्या काठी असणाऱ्या अनेक घरांची पडझड झाली, रस्ते खचले, मुख्यतः भातपिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान (Damages) झाले आहे. अगोदरच एक जुलै पासून पाऊस नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होतं आणि आता मुसळधार पावसाने त्यांच्या शेतातून सर्व पीकच वाहून नेले. त्यामुळे इथला शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे.

मुसळधार पावसाने मुळशीतील जनजीवन विस्कळीत; भातपिकांच नुकसान
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तहसील कार्यालयाने पंचनामे करावेत

''आमची वडिलोपार्जित शेती आहे. भात हेच आमचं एकमेव पीक आहे. तेच वाहून गेलं तर खायचं काय, आम्ही ब्रिटिशकालीन धरणग्रस्त आहोत. आमची शेती धरणात गेल्यामुळे आूा आमच्याकडे थोडीच जमीन आमच्याकडे शिल्लक राहिली आहे. आता या पावसाने तेही वाहून गेली. ह्या ढगफुटीमुळे आमच्या शेतीचे फारच नुकसान झालं आहे. खायचं काय हा प्रश्न आ वासून आमच्या पुढे उभा आहे, अशा शब्दांत मावळातील एका शेतकऱ्यांने आपली खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुळशी तालुक्‍यात खरच मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले असेल तर प्रशासनाकडून त्यांना नक्कीच मदत मिळेल, अशी ग्वाही मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे. मागील तीन दिवसात मावळ परिसरात एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. रस्तेही वाहून गेले आहे. जीवित हानी नाही मात्र काही ठिकाणी गाई बैल वाहून गेले आहे. तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून नक्कीच त्यांना मोबदला दिला जाईल, असे आश्वासन यावेळी तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिले आहेत.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com