Figures of Vehicles in Pune : पुण्यातील वाहनांची गर्दी यावर्षीही वाढली; महापालिकेने वाढीव वाहनांचा आकडा केला जाहीर

Pune News Update : महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दरवर्षी शहराच्या पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल तयार केला जातो.
Figures of vehicles in Pune
Figures of vehicles in PuneSaam Tv

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील वाहनांची वाढती संख्या वाहतूक कोंडीसाठी निमित्त ठरत आहेत. मात्र पुण्यातील वाहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे शहरातील वाहनांच्या संख्येचा आकडा २०२३ मध्ये आणखी वाढला आहे.

मागील वर्षी  पुण्यात २ लाख ५५ हजार ७५७ नवीन वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे जून २०२३ पर्यंत एकूण ३५ लाख ९४ १३२ वाहनांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दरवर्षी शहराच्या पर्यावरण सद्य:स्थितीचा अहवाल तयार केला जातो.

२०२२-२३ वर्षाचा पर्यावरण अहवाल महापालिकेने बुधवारी जाहीर केला. या अहवालात शहरातील वृक्ष, पक्षी, कचरा, पाणी, वायू प्रदूषण आदी माहिती देण्यात आली आहे. तसेच पर्यावरण सुधारण्यासंदर्भात केल्या जाणार्‍या उपाययोजनांचीही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Figures of vehicles in Pune
Pune Terrorist News : पुण्यातून डॉक्टरला अटक, ISIS दहशतवादी संघटनेसाठी भरतीची होती जबाबदारी, NIA ची मोठी कारवाई

प्रशासनाकडून सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र,खासगी वाहनांचा वापर अद्याप कमी होताना दिसत नाही. जून २०२३ पर्यंत एकूण ३५ लाख ९४ हजार १३२ वाहनांची नोंद झाली.

Figures of vehicles in Pune
RTO Choice Number: श्रीमंत पुणेकर! वाहनांच्या आकर्षक क्रमांकासाठी खर्च केले लाखो रुपये; '१ लाख ८० हजार किंमतीचा नंबर कोणता?

२०२१ (१ लाख ६९हजार ५५२) च्या तुलनेत २०२२ मध्ये नवीन २ लाख ५५ हजार ७५७ वाहनांची भर पडली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पीएमपीएलच्या एकूण २ हजार ७९ बस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी १ हजार ४२१ बसेस सीएनजी इंधनावर तर ४५८ इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com