Pune : अबब..! पुणे महापालिकेचा कर्मचारी निघाला चोर
Pune : अबब..! पुणे महापालिकेचा कर्मचारी निघाला चोरसाम टीव्ही

Pune : अबब..! पुणे महापालिकेचा कर्मचारी निघाला चोर

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारीच मोबाईल चोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून संबंधित कर्मचाऱ्याने त्याच्यावरील कर्ज फेडण्याकरता मोबाईल चोरीचा हा मार्ग निवडला होता.

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारीच मोबाईल चोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून संबंधित कर्मचाऱ्याने त्याच्यावरील कर्ज फेडण्याकरता मोबाईल चोरीचा हा मार्ग निवडला होता. आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पावणे दोन लाख रुपये किंमतीचे एकूण २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

हे देखील पहा :

तानाजी शहाजी रणदिवे (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याच वाढत्या मोबाईल चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बिबवेवाडी परिसरात गस्त घालण्यात येत होती. दरम्यान, परिसरातील गंगाधाम रस्त्यावरील महावीर गार्डनजवळ मुख्य रस्त्यावर एक इसम चोरीचे मोबाईल विकत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

Pune : अबब..! पुणे महापालिकेचा कर्मचारी निघाला चोर
Mumbai Breaking : मुंबईतील साकीनाक्यात महिलेवर बलात्कार! [व्हिडीओ]

त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचे व स्वतःवरील कर्ज फेडण्यासाठी बिबवेवाडी, मार्केटयार्ड परिसरातून ५० पेक्ष्या जास्त मोबाईलची चोरी केल्याचे पोलिसांपुढे कबूल केले. सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या पथकाने गुन्ह्याची उकल करण्याची कामगिरी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com