
Pune Crime News : एसीबीने पुणे (pune acb) महापालिकेच्या (pune muncipal corporation) आरोग्य निरीक्षकाला (health officer) ३० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी पकडले आहे. संबंधित कर्मचा-याला अटक (arrest) करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)
ही कारवाई महापालिकेच्या नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली. सचिन धर्मा गवळी (वय ३४) या आरोग्य निरीक्षकाने एका बिगारी मुकादमास ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार त्याने नाेंदवली हाेती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २७) सापळा रचून गवळी याच्यावर कारवाई केली.
गवळी हे नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन- आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक आहेत. तर, तक्रारदार हे त्याच कार्यालयात बिगारी मुकादम म्हणून काम करतात.
गवळी याने या क्षेत्रीय कार्यालयातून बदली न करण्यासाठी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत मुकादमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात गवळी याने स्वत: आणि वरिष्ठांसाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करून गवळी याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.