दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दुदैवी घटना; चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या 2 कामगारांचा मृत्यू

वाघोली येथील सोळांसिया सोसायटीतील घटना
Pune News
Pune NewsSaam Tv

पुणे - दिवाळीच्या (Diwali) पहिल्याच दिवशी एक दुदैवी घटना घडली आहे. सोसायटीच्या चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षाकाचा शोध घेण्याचे काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून सुरू आहे. वाघोली (Pune) येथे शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Pune Latest News)

Pune News
Delhi : सोसायटीच्या निवडणुकांवरून सुरक्षारक्षक आणि लोकांमध्ये तुफान हाणामारी; Video व्हायरल

वाघोली येथील सोलांसिया नावाची सोसायटीमध्ये ही दुदैवी घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजता दोन कामगार या सोसायटीच्या परिसरातील चेंबरमध्ये काम करण्यासाठी आले होते. चेंबर साफ करत असतानाच दोन कामगार चेंबरमध्ये पडले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने वाचविण्याच्या प्रयत्न केला.

त्यावेळी सुरक्षा रक्षक देखील या चेंबर मध्ये पडल्याची माहिती तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर तेथे तत्काळ दखल झालेल्या जवानांनी चेंबर मधून दोघांचे मृतदेह बाहेर काढले, तर सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. मृत्यू पावलेल्या दोन कामगारांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com