Pune News : भयंकर घटना! एकाच कुटुंबातील ७ जणांनी संपवलं जीवन, नदीकाठी आढळले मृतदेह

पुण्यात एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस केली आहे.
pune news
pune news Saam tv

Pune News : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस केली आहे. पुण्याच्या दौंड तालुका भागात ही घटना घडली आहे. या आत्महत्या केलेल्या ७ जणांचे मृतदेह नदीकाठी आढळले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

pune news
Jagdish Gaikwad : मुंबई पोलिसांकडून पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना अटक; काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाहत असलेल्या भीमा नदीत चार मृतदेह आढळले होते.ते मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी मुलगी आणि जावई यांचे चार मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत हे मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह सहा दिवसांपूर्वीच आढळून आले होते. या मृतदेहांची ओळख पटली आहे.

चार मृतदेह नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील व्यक्तींचे असल्याची माहिती समोर आली आहे. चार जणांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कुटुंबातील आणखी ३ लहान मुले बेपत्ता आहेत. मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या कुटुंबासोबत चार वर्षाच्या आतील ३ लहान मुले आहेत. ३ मुले अद्याप बेपत्ता आहेत.

pune news
Pune Breaking News : पुण्यात खळबळ; पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गोळीबार

आत्महत्या की घातपात?

कुटुंब मंगळवारी १७ जानेवारी रोजी अकरा वाजण्याच्या नंतर एका वाहनाने निघोज या गावातून निघून गेले. शिरूर - चौफुला रोडवर असलेल्या दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. १८ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २०, २१ व २२ जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते.

भीमा नदीच्या पात्रात मागील पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळून आल्याने यवत पोलीस सतर्क झाले आहेत. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या तीन लहान मुलांचा अद्याप शोध लागला नाही. ही प्रथम दर्शनी आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परंतु ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास दौंड पोलीस करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com