Pune News : कोयता गँग संपलीच समजा! पुणे पोलिसांची भन्नाट आयडिया, कोयता खरेदीसाठी हे डॉक्युमेंट लागणार

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. यावर कडक पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं.
Pune Police
Pune Police Saam TV

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन करून देखील कोयता गँगची दहशत कमी होत नाही.

कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आता पुणे पोलिसांनी नवीन शक्कल लढवली आहे. यापुढे शहरात कुठेही कोयता खरेदी करायचा असेल तर आधारकार्ड द्यावं लागणार आहे. पुणे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Pune Police
Sangali News: अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा दुचाकी अपघात; विहिरीत पडून प्रेयसीचा मृत्यू, सांगलीमधील हृदयद्रावक घटना

शहरात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घटनांमध्ये कोयत्याचा वापर दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सध्या शहरात कोयता खरेदीसाठी आधार कार्ड द्यावं लागणार आहे. यात कोयता कुणी विकत घेतला याची माहिती पोलिसांना मिळणार आहे.

Pune Police
सत्यजीत तांबेना निकालाच्या महत्त्वाच्या दिवशी मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. यावर कडक पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं. यात अनेक गुन्हेगारांवर कारवाई देखील करण्यात आली.

आता पुढचं पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणाऱ्याला आता पोलिसाच्या आदेशाचं पालन करावं लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com