Khed News
Khed NewsSaam Tv

मराठी शाळाच भारी! अमेरिकेतल्या मुलाला जिल्हा परिषद शाळाच्या शिक्षणाची भुरळ

मातृभाषा आणि स्पर्धा परिक्षेच्या शिक्षणाची अमेरिकेतील मुलांना भुरळ

पुणे - अत्याधुनिक इमारत, उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी अमेरिका अग्रगन्य मानली मात्र अमेरिकेच्या तोडीसतोड शिक्षणाचा झेंडा पुण्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत रोवला जात आहे. अमेरिकेतील (America) कॉलटेक्सेस शहरातील कोपेल मिडल शाळेत (School) इयत्ता पाचवीत शिकणारा रुग्वेध नेहेरे हा विद्यार्थी सध्या सुट्टीच्या निमित्ताने पुण्यातील (Pune) टाकळकरवाडीत आला आहे.

सुट्टीत अभ्यासाला खंड पडायला नको म्हणुन रुग्वेध टाकळकरवाडीतील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहे. त्याला आता या मराठी शाळेची चांगलीच गोडी लागली आहे. अमेरिकेतील उच्च इमारतीच्या तुलनेत या शाळा छोट्या आहेत. मात्र मराठीच्या मातृभाषेचे शिक्षण आणि स्पर्धा परिषदेचे शिक्षण अमेरिकेत मिळत असल्याने मराठी शाळाच भारीच वाटायला लागली आहे.

हे देखील पाहा -

अनेकदा प्रत्येक पालक भविष्यात आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी चांगली शैक्षणिक सुविधा,मुलांच्या शैक्षणिक दर्जा कोठे मिळेल, याबद्दल नेहमी सतर्क राहतात यावेळी अनेकदा इंग्रजी माध्यमाच्या शाळेला पसंतीही दिली जाते उच्च तंत्रज्ञान,अद्यावत अध्यायन भव्य इमारतीत शिक्षण घेत असताना मुलांना मात्र मराठी शाळातील शिक्षण प्रणाली सोपी वाटत आहे. कारण लहान वयातच स्पर्धा परिक्षेच्या शिक्षणाबरोबर मातृभाषेचे शिक्षण मिळत आहे. यातून आपल्या चांगल्या शिक्षणाबरोबर संस्कृती जपली जात रुग्वेध व्यक्त केली आहे.

Khed News
‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची टीका

आजची मुलं उद्याचं देशाचे भविष्य आहे या मुलांच्या जडणगणीत अद्यायणाच्या पलीकडे जाऊन कला, क्रिडा,सण संस्कृती जपत मुलांच्या कलाकौशल्याला वाव दिला जातो त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड,शाळेची ओड,शिक्षकांबद्दल आदर मराठी शाळेतील मुलांमध्ये जास्त पहायला मिळतो त्यामुळे मुलांना पुस्तकी शिक्षणाबरोबर सुण संस्कृती,देशप्रेम, आणि क्रिडा क्षेत्रात शिक्षण दिले जाते. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत मराठी शाळेतील अद्यापणाच्या पलीकडे जाऊन दिले जाणारे शिक्षणातून आजच्या पिढी पुढे देशात घडणार हे मात्र नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com