Breaking News : पुणकरांनो लक्ष द्या! चांदणी चौकातील पूल पाडण्याचा दिवस अखेर ठरला

चांदणी चौकातील पूल २ ऑक्टोबर रोजी पाडण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
pune news
pune news saam tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune Chandani Chowk Bridge Demolition News : पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी चांदणी चौकातील पूल (Bridge) पाडण्याचा दिवस अखेर निश्चित करण्यात आला आहे. सदर पूल १८ सप्टेंबर रोजी पाडण्यात येणार होता. मात्र, पुण्यातील (Pune) मुसळधार पावसामुळे चांदणी चौकातील पूल पाडण्याचं काम लांबणीवर पडलं होतं. त्यानंतर चांदणी चौकातील पूल पाडण्याची तारीख अखेर २ ऑक्टोबर अशी ठरली आहे.

pune news
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १८ तासांपासून ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम पावसामुळं पुढे ढकललं होतं. पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर पूल येत्या १८ सप्टेंबर रोजी हा पूल पाडण्यात येणार होता. मात्र, सततच्या पावसामुळे पूल पाडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.

मात्र, पुण्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे आता पूल पाडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. २ ऑक्टोबर रोजी हा पूल पाडण्यात येणार आहे. पूल पाडण्याच्या दिवशी वाहतूक इतरत्र वळवली जाईल. तसेच पूल पाडण्याच्या अनुषंगाने याचे मार्ग देखील येत्या २,३ दिवसांत आखले जातील, अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चांदणी चौकातील पूल पाडण्याबाबतच्या कामाचा सविस्तर अहवाल हा येत्या मंगळवारी जाहीर करण्यात येईल. चांदणी चौकातील पूल ज्या दिवशी पाडण्यात येणार,त्या दिवशी पर्यायी मार्गांबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.

pune news
Pune: मायक्रो फायनान्सद्वारे कर्जाचे आमिष, १०० ते १५० जणांची फसवणूक; YouTube कलाकार बंटी-बबलीला अटक

पूल नेमका कसा पाडणार ?

पुण्यातील चांदणी चौकातील पूल आता १८ सप्टेंबर नंतर पाडण्यात येणार आहे. सदर पूल पाडण्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रिलींग करण्याचे काम सुरू केले आहे. स्फोटानंतर चांदणी चौकातील पूल हा ९ ते १० सेंकदांमध्ये जमिनदोस्त होणार आहे. तसेच हा पूल पाडण्याठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. याच कंपनीने दिल्लीमधील ट्ववीन टॉवर्स पाडले होते. सदर पूल पाडल्यानंतर त्याजागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणेकरांना चांदणी चौकात वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत होतं. त्यामुळे पुणेकर वाहतूक कोंडीला वैतागले होते. या वाहतूक कोंडीच्या अनेक समस्या मुख्यमंत्र्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. सदर पूल हा २ ऑक्टोबर रोजी पाडण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com