Pune CNG Price : पुणेकरांच्या खिशाला कात्री; सीएनजी दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवे दर

रविवारी मध्यरात्रीपासून ही वाढ करण्यात आली असून या दरवाढीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
Pune CNG Price
Pune CNG Price Saam TV

Pune CNG Price : सणासुदीच्या काळात पुण्यातील (Pune) वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण, पुण्यात सीएनजीच्या (CNG) दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ही वाढ करण्यात आली असून या दरवाढीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने हा निर्णय घेतला आहे. (Pune News Today)

Pune CNG Price
Mumbai News : मुंबई विमानतळावर 5 किलो हेरॉईन जप्त, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहनं असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग ही सुद्धा दरवाढीची कारणं आहे.

विशेष बाब म्हणजे, १ एप्रिल पासून सीएनजीच्या दरात वाढच होत आहे. शहरात पूर्वीच सीएनजी ९१ रूपयांवर गेला होता. पण, काही दिवसांपूर्वी एमएनजीएलने सीएनजीच्या दरात चार रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता एका किलोसाठी ८७ रूपये द्यावे लागत होते.

दरम्यान, आता पुन्हा सीएनजीच्या दरामध्ये ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना रविवारी मध्यरात्रीपासून १ किलो सीएनजीसाठी ९१ रुपये मोजावे लागणार आहेत.सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक तसेच रिक्षा चालकांना फटका बसला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com