Dattatray Gadgil Patent News: जात्याला व्यायामाच्या उपकरणाचा दर्जा, दत्तात्रय गाडगीळ यांना मिळालं पेटंट

Hadapsar News: जात्याला व्यायामाच्या उपकरणाचा दर्जा, हडपसरच्या दत्तात्रय गाडगीळ यांना मिळालं पेटंट
Pune News
Pune NewsSaam TV

>> प्रशांत जाधव

Pune Latest News: पूर्वी घराघरांत गहू, बाजरी आणि ज्वारी दळायला जाते वापरले जात होते. मात्र आता हे जाते कालबाह्य झाले असले तरी त्याचे मोल कायम आहे. या जात्याचा वापर करून व्यायामाचे 'वेतोबा उपकरण' तयार करण्यात आले आहे. हे उपकरण हडपसर येथील राशीवासी दत्तात्रय गाडगीळ यांनी बनवलं आहे.

वेतोबा उपकरण (जात्याला) व्यायामाच्या उपकरणाचा दर्जा मिळावा म्हणून दत्तात्रय गाडगीळ यांनी सात वर्षे प्रयत्न केल्यावर केंद्र सरकारनेही त्यांची दखल घेतली. व्यायामाचे उपक्रम म्हणून या उपकरणाला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे.

Pune News
Karnataka Election 2023 : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा भाजपला रामराम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

मूळच्या अभियंता असलेले गाडगीळ यांनी जात्यावर व्यायाम करायचा तर त्यासाठी कोणालाही वापरता येईल, असे उपकरण तयार केले. पाच ते सहा हजार रुपयात तयार होणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी 'वेतोबा उपकरण' असे नाव ठेवले आहे. (Latest Marathi News)

Pune News
Buldhana News: 'शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये पळविणाऱ्या व्यापाऱ्याच्या मदतीला रविकांत तुपकरांची पत्नी? शिंदे गटाने असा गंभीर आरोप का केला?

याबद्दल बोलताना गाडगीळ म्हणाले की, ‘‘पूर्वीच्या काळी महिला जात्याचा वापर करत असल्याने त्यांचे आरोग्य उत्तम होते. आजही अनेक योग शिक्षक व्यायाम प्रकार म्हणून जातं चालवा, असे सांगतात. जातं वापरताना, त्यासाठी खोलगट जागा लागते, त्याचा आवाज येतो, या अडचणी नव्या उपकरणात दूर केल्या. त्यातून व्यायामाचे उद्दिष्ट साध्य केले.’’

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com