Pune Divorce Case: उच्चशिक्षित बायकोने नवऱ्याला दिली ५० हजारांची कायमस्वरुपी पोटगी! या 5 अटींवर मंजूर झाला घटस्फोट

Divorce Case in Pune : नोकरी नसल्याने घरीच असलेल्या पतीला ५० हजार रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे पत्नीने मान्य केले.
Divorce Case in Pune
Divorce Case in Pune saam tv

Pune News: पुण्यात एका उच्चशिक्षित बायकोने बेरोजगार नवऱ्याला ५० हजार रुपयांची कायमस्वरुपी पोटगी देऊन घटस्फोट घेतला आहे. नोकरी नसल्याने घरीच असलेल्या पतीला ५० हजार रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे पत्नीने मान्य केले. त्यामुळे विभक्त होण्याच्या अटी ठरवत दोघांनी संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा न्यायालयाने निकाली काढला. या प्रकरणात पत्नीने नोकरीबाबत खोटी साक्ष दिली दिल्याचे पतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पत्नीने तडजोडीची तयारी दर्शवली.

सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. व्ही. फुलबांधे यांनी हा निकाल दिला. आधी नोकरीबाबात खोटी साक्ष दिल्यानंतर पत्नीने तडजोडीची तयारी दाखवली आणि कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मंजूर केले. यानंतर पतीने देखील पोटगीच्या अंतरिम आदेशाबाबत दाखल केलेले अपील आणि पत्नीने खोटी साक्ष दिल्याची तक्रार मागे घेतली. यानंतर कोर्टाने दोघांना घटस्फोट मंजूर केला. पतीच्या वतीने ॲड. नरेंद्र बाबरे यांनी युक्तिवाद केला.

Divorce Case in Pune
Mobile Side Effects : मोबाईलमुळे वाढतो उच्चरक्तदाबाचा धोका, हृदयावर होतो दुष्परिणाम! संशोधनातून धक्कादायक खुलासा

नेमकं काय आहे प्रकरण?

अशोक आणि सुजाता (नावे बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांचा ऑगस्ट २०१८ मध्ये विवाह झाला होता. कौटुंबिक वाद झाल्याने ते जून २०२० पासून विभक्त राहत आहेत. अशोक यांनी बी.टेकचे शिक्षण घेतले आहे, तर सुजाता यांनी एम. टेकची पदवी मिळवली आहे. त्या एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतात.

वाद झाल्याने सुजाता यांनी पतीपासून घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यात न्यायालयाने पोटगीचा अंतरिम आदेश दिला होता. मात्र पोटगी मिळण्यासाठी पत्नीने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचे पतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्याबाबतची तक्रार दाखल केली.

नोकरी नसल्याने पत्नीनेच आपल्याला पोटगी द्यावी असा अर्ज देखील अशोक यांनी दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तडजोडीने दावा निकाली काढण्याबाबत विचारणा केली असून दोघांनी त्यास तयारी दाखवली. तर पत्नीने पोटगी देण्यास होकारर दिला. (Pune News)

या अटींवर मंजूर झाला घटस्फोट :

- लग्नात एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू परत करायच्या

- पत्नीने पतीला ५० हजार रुपये एकरकमी पोटगी द्यायची

- पत्नीने पोटगी मागण्याचा हक्क कायमस्वरूपी सोडून द्यायचा

- पतीने केलेली तक्रार व अपील मागे घ्यायचे

- एकमेकांच्या स्थावर व जंगम मालमत्तेत हक्क सांगायचा नाही

Divorce Case in Pune
Jalgoan News: भररस्त्यात तरुणीने तरुणावर केला चाकूहल्ला, जळगावचा Video होतोय व्हायरल

'पत्नीने दाखल केली होते खोटे प्रतिज्ञापत्र'

पतीचे वकील ॲड. नरेंद्र बाबरे यांनी सांगितले की, पोटगी मिळण्यासाठी पत्नीने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यामुळे तीने न्यायालयाची फसवणूक केल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिले. त्याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पत्नीने तडजोडीची तयारी दर्शवली. त्यानंतर दोघांनी पोटगीचे अर्ज मागे घेतले. खूप कमी प्रकरणांत अशा प्रकारचा आदेश न्यायालय देत असते, असे बाबरे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com