Leopard Attack Marathi
Leopard Attack MarathiSaam TV

Leopard Attack : जवळच उभा होता बिबट्या, कुत्रा असल्याचा झाला भास; नशीब बलवत्तर म्हणूनच मायलेकी वाचल्या

अंगावर काटा आणणारी ही घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील चिखली परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

Pune Leopard Attack : शेतात काम करणाऱ्या मायलेकीसमोर अचानक बिबट्या येऊन उभा राहिला. सुरूवातीला त्यांना कुत्रा असल्याचा भास झाला. पण बिबट्या असल्याची खात्री पटताच, मायलेकींच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, धीर न सोडता त्यांनी या बिबट्याची नजर चुकवून दोघींनीही तेथून धूम ठोकली.

अंगावर काटा आणणारी ही घटना पुण्यातील (Pune News) आंबेगाव तालुक्यातील चिखली परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे.

Leopard Attack Marathi
Pune Crime : पुण्यात चाललंय काय? दोन दिवसांत ६ महिलांच्या गंभीर तक्रारी, पोलिसांत गुन्हे दाखल

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली (तालुका) आंबेगाव येथे हांडे वस्तीत आज संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या माजी सरपंच अनिता विजयराव आढारी यांच्यापासून पंधरा ते वीस फुटावर बिबट्या उभा होता. सुरुवातीला त्यांना कुत्रा असल्याचा भास झाला.

पण बिबट्या असल्याची खात्री पटल्यानंतर त्या व त्यांची मुलगी मनोरमा या दोघींनीही तेथून धूम ठोकली. नशीब बलवत्तर म्हणूनच मी व माझी मुलगी वाचलो. असे अनिता आढारी यांनी सांगितले. आदिवासी डोंगरी भागात चिखली गाव व हंडे वस्ती आहे.  (Latest Marathi News)

कांद्याच्या पिकात खुरपणी करून त्या तीस ते चाळीस मिटर अंतरावर असलेल्या घराकडे जाण्याच्या तयारीत होत्या. त्यांना पंधरा ते वीस फूट अंतरावर उभा असलेला बिबट्या पाहून त्यांची अक्षरशः गाळन उडाली. ताबडतोब त्यांनी घरात जाऊन दरवाजा लावून घेतला.

Leopard Attack Marathi
Pune News : पुण्यात ट्रेकसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मित्राला फोन करुन सगळी परिस्थिती सांगितली, पण...

बॅटरीच्या प्रकाशात खिडकीतून बिबट्याचा (Leopard) अंदाज घेतला. त्यानंतर त्यांनी घराच्या जवळ फटाकेही वाजवले. पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्याचे अनिता आढारी यांनी सांगितले. विशेष म्हणजे दीड किलोमीटर अंतरात एकमेव अनिता आढारी यांचे घर आहे.

गेले दहा ते पंधरा दिवस या भागात बिबट्याचा मुक्त संचार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात वन खात्याने पिंजरा लावून बिबट्याला जेर बंद करावे अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय आढारी यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com