Malshej Ghat Travel: सावधान! माळशेज घाटातून प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच...

Malshej Ghat Travel News: तुम्ही जर कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटातून प्रवास करणार असला, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.
Malshej Ghat Travel News
Malshej Ghat Travel NewsSaam TV

Malshej Ghat Travel News: तुम्ही जर कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटातून प्रवास करणार असला, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, माळशेज घाटात दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाकडून देण्यात आल्या आहेत. (Breaking Marathi News)

माळशेज घाटातील रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे कॉक्रिटिकरण सुरू करण्यात आले आहे. घाटात पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील १० किलोमीटर अंतरावर हे कॉक्रिटिकरण सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

Malshej Ghat Travel News
Gautami Patil Nashik Program: नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण; धक्कादायक VIDEO

त्यामुळे येत्या १९ मे पासून दर गुरूवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घाटात दगड फोडण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे माळशेज घाटातून (Malshej Ghat) प्रवास करत असताना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. मात्र, या पर्यायाने अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी राहणार आहे.

असा असेल पर्यायी मार्ग...

कल्याणवरून येताना खुबी-करंजाळे-खिरेश्वर ते कोल्हेवाही-सागनोरी-पिंपळगाव जोगा-भोईरवाडी-कोळवाडी-ओतुर-आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी वाहतूक व्यवस्था राहणार आहे. वाहनधारकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.

Malshej Ghat Travel News
Yavatmal Accident News: अतिवेग जीवावर बेतला! एसटी बस, पिकअप वाहनाचा भयानक अपघात

पावसाळा सुरू होताच मन प्रसन्न करणाऱ्या माळशेज घाट परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढते. त्यामुळे घाटातून हजारो पर्यटकांची वाहने येत जात असतात. अशातच काही वेळा घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. माळशेज घाट हा शिवकालीन घाट आहे.

या घाटातुन मुंबई आणि जुन्नरकडे प्रवास करत असताना पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यंदा पाऊसाळ्याच्या आधीच वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक ठिकाणी डागडुजीचे काम सुरू केले असून रस्त्याचे काँक्रेटिकरण सुद्धा सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com