Pune News Today: पिंपरी-चिंचवड वेगळा जिल्हा होणार? भाजप आमदाराने देवेंद्र फडणवीसांंना नावही सूचवलं

Pune News Today: भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
Pimpri chinchwad
Pimpri chinchwadsaam tv

Pune News: पुण्याचा मागील काही वर्षात विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. यामुळे पुणे जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्हा तयार करण्यात यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडचं विभाजन करण्याची मागणी समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड शहर आणि त्याला लागून असलेल्या भागाचा वेगळा जिल्हा करण्याची मागणी भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांनी ही मागणी केली आहे.

Pimpri chinchwad
Ajit Pawar Prediction: १६ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही, अजित पवारांच्या म्हणण्यामागचं गणित काय?

पिंपरी चिंचवड शहर आणि त्याला लागून असलेल्या भागाचे झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनंतर शिवनेरी जिल्ह्याच्या निर्मितीला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

Pimpri chinchwad
Karnataka Next CM: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी काँग्रेसकडून 3 फॉर्म्युल्यांचा विचार; डीके शिवकुमार यांचं काय होणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. यादरम्यान ग दि माडगूळकर सभागृहाचे उद्घाटन करत असताना महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुणे जिल्हा विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करण्यात यावा अशी मागणी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com