Pune Crime News: कोयता गँगचा करेक्ट कार्यक्रम; जिथे दहशत माजवली, त्याच रस्त्यावरून धिंड काढली

तोडफोड केल्यानंतर दोघेही लवासा परिसरात जाऊन लपून बसले होते.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Crime News: पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंगने हैदोस घातला आहे. हातात कोयता घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांमुळे खडकवासला परिसरातील नागरिक भयभीत झालेत. अशात आता सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्या ठिकाणी या गुंडानी धुमाकूळ घातला होता तिथेच पोलिसांनी त्यांची मजबूत धुलाई केली आहे. (Pune Latest Crime News)

काही दिवसांपूर्वी गुंडांनी खडकवासला आणि सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात हैदोस घातला होता. हातात तलवार आणि कोयते घेत अनेकांच्या वाहनाचे नुकसान झाले. रस्त्यावर असलेल्या चारचाकी आणि दुचाकीच्या काचांवर त्यांनी दगडफेक केली. तसेच भाजी मंडई परिसरात नागरिकांसमोर कोयते दाखत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी पाच कार आणि एका टेंपोची कोयता तसेच लोखंडी रॉडने तोडफोड केली होती. सदर घटनेने नागरिकचा संताप झाला होता. तोडफोड केल्यानंतर दोघेही लवासा परिसरात जाऊन लपून बसले होते. या गुन्हेगारांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात होती.

Pune Crime News
Pune Crime News: हवेत गोळीबाराची आणखीन एक घटना; दहशत परवण्यासाठी तमा न बाळगता गोळीबार

अशात पोलिसांसमोर या टोळक्याला पकडण्याचे आवाहन होते. त्यामुळे त्यांनी सापळा रचत खडकवासला येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विलास कोंडीबा मरगळे( वय २२ रा.आडमाळ लवासा ता. मुळशी, पुणे) आणि सौरभ कोंडीबा कांबळे ( वय २१ रा. खडकवासला, पुणे) या दोन सराईत गुन्हेगारांसह इतरांना अटक केली आहे.

Pune Crime News
Pune Breaking | कोयता गँगच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांशी खास बातचीत

" जास्त गर्दी करू नका, गडबड करू नका ! भाई आले आहेत, त्यांचा आपल्याला 'योग्य' सत्कार करायचा आहे. फक्त सर्वांना विनंती आहे आपले मोबाईल बाहेर न काढता 'कार्यक्रम' पाहा!, असे हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले. ज्या परिसरात या गुन्हेगारांनी दहशत माजवली होती तिथेच पोलिस त्यांना घेऊन गेले. गुन्हेगारांना पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली. या गर्दीसमोर पोलिसांनी दोघांचीही जोरदार धुलाई केली आणि त्या परिसरातून त्यांची धिंड काढली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com