
Pune Fake University News: दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र देऊन शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट विद्यापीठाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून पोलिस तपासात त्यांनी आत्तापर्यंत ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना पैसे घेऊन प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या (एसएससी बाेर्ड) दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्रे देणारी एक टाेळी पुणे पाेलीसांच्या गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)
सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम, कृष्णा सोनाजी गिरी (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर) आणि अल्ताफ शेख (रा. परंडा, जि. धाराशिव) यांना अटक केली आहे. हे आरोपी ‘अलहिंद विद्यापीठ’ ही अस्तित्वात नसलेली विद्यापीठ वेबसाईट तयार करुन या माध्यमातून नापास असलेल्या विद्यार्थ्यांना ३० ते ५० हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र देत होते. हा प्रकार २०१९ पासून सुरु होता.
टाेळीचा मुख्य सुत्रधार असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या आरोपीने राज्यभरात मागील चार वर्षापासून बनावट पदव्यांची ४० ते ६० हजारात खिरापत वाटल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गैरव्यवहारातून पैसा जमा करुन पुढील दाेन वर्षात संभाजीनगर येथे त्यास जमीन घेऊन स्वतंत्र विद्यापीठ स्थापना करायचे होते,अशीही धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
आत्तापर्यंत ३५ बनावट प्रमाणपत्र ताब्यात घेण्यात आले असून त्याची संख्या माेठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आरोपीच्या पाेलीस काेठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Pune Police)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.