Vikas Tingre News: काँग्रेसचे पदाधिकारी विकास टिंगरेंनी संपवलं आयुष्य; नेमकं कारण काय?

Vikas Tingre News Today: या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Vikas Tingre News
Vikas Tingre NewsSaam Tv

अक्षय बडवे

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहर काँग्रेसचे विश्रांतवाडी ब्लॉक अध्यक्ष विकास टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता. २३) दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Vikas Tingre News
Simple One electric scooter: मुंबई ते पुणे एका चार्जमध्ये गाठणार! नवीन सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नेहमीप्रमाणे टिंगरे हे त्यांच्या कार्यालयात आले होते. ते दुपारी जेवले नसल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या केबिन मध्ये जाऊन पाहिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. पुण्यातील (Pune) पोरवाल रोड धानोरी येथील त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांनी आत्महत्या केली. (Pune News)

Vikas Tingre News
Samruddhi Mahamarg : CM शिंदेंनी समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत दिली महत्वाची अपडेट; नागरिकांना होणार आणखी फायदा

घटनास्थळी विमानतळ पलिसांनी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, टिंगरे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com