Pune Collages News : पुण्यातील महाविद्यालयांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नेमकं कारण काय?

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पूर्वसूचना देण्यात आली आहे.
pune university
pune universitySaam Tv

अक्षय बडवे

Pune News : पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील मार्गदर्शनाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्याची गरज आहे. मात्र, याच बाबतीत पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच महाविद्यालये नापास झाली आहे.

११९२ महाविद्यालयांनी अजूनही समान संधी केंद्र स्थापन केले नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पूर्वसूचना देण्यात आली आहे. (Maharashtra News)

pune university
Mumbai-Pune Express Way Traffic Jam : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशीही मोठी वाहतूक कोंडी, मज्जा करायला निघालेल्या नागरिकांचा हिरमोड

या केंद्रासंदर्भात समाजकल्याण विभागाने जानेवारी २०२२ मध्ये निर्देश दिले होते. जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांसह कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनीही आजवर एकही समान संधी केंद्र स्थापन केलेले नाही.  (Latest Marathi News)

pune university
Pimpari Chinchwad Hit-And-Run Case: कारने चिमुकल्याला ५० फूटांपर्यंत फरफटत नेलं, भयानक अपघात CCTV मध्ये कैद

काय आहे समान संधी केंद्र?

महाविद्यालयांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या निवारणासाठी महाविद्यालय स्तरावर असे केंद्र स्थापन करण्याचे समाज कल्याण विभागाने सांगितले आहे. प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन करण्यात यावी तसेच याला विभाग प्रमुख सदस्य सचिव असावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com