Pune Cyber Crime: ट्रेडिंग वेबसाईटवरील गुंतवणूक पडली महागात; सायबर चोरट्यांनी घातला १ कोटीला गंडा

Pune Online Fraud: या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Pune Fraud News
Pune Fraud NewsSaamtv

अक्षय बडवे प्रतिनिधी...

Pune Cyber Crime: पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खून, दरोडा, सायबर क्राईमसह आता फसवणुकीचे प्रकार देखील वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरणे सध्या उघडकीस येत असून मोबाइल आणि ई-मेलद्वारे संपर्क करून ४६ वर्षीय व्यक्तीची १ कोटींची फसवणूकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. (Pune Online Fraud Latest News)

Pune Fraud News
Jalgaon News: जळगाव ‍परिमंडलात ११ हजार ७९४ वीजचोर; ८८ जणांवर गुन्‍हे दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, डिजिटलच्या युगात चोरटे डिजिटल झाले आहेत. लोकांना गंडवण्याचे नवनवीन प्रकार ते शोधत आहेत. पुण्यात असेच एक ऑनलाईन (Online Fraud) फसवणूकीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यामध्ये ज्यादा परताव्याचे आमिष १ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हरिश काळे यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मोबाइल आणि ई-मेलद्वारे त्यांच्याशी सायबर चोरट्यांकडून संपर्क साधण्यात आला. ज्यानंतर ट्रेडेक्स डॉट कॉम या वेबसाईट वरून बोलत असल्याचे सांगून काळे यांचा सुरवातीला विश्वास संपादन करण्यात केला. (Latest Marathi News)

Pune Fraud News
Ahmednagar Accident News: ट्रक आणि कारची जोरदार धडक, वाहनाचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू

ज्यानंतर त्यांना या वेबसाइटमध्ये गुंतवणूक करा आणि मोठा परतावा मिळवा असे सांगण्यात आले. काळे यांनीही यावर विश्वास ठेवला. ज्यासाठी चोरट्यांनी त्यांच्याकडून एकूण १ कोटी १२ लाख ६० हजार किमतीचे २.७ बीटकॉइन घेतले. मात्र याचा कुठला ही परतावा मिळाला नसल्यामुळे काळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. (Pune Police)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com