Pune: मावळातील भडवली गावात सार्वजनिक जेवणातून नागरिकांना विषबाधा!
Pune: मावळातील भडवली गावात सार्वजनिक जेवणातून नागरिकांना विषबाधा!दिलीप कांबळे

Pune: मावळातील भडवली गावात सार्वजनिक जेवणातून नागरिकांना विषबाधा!

30 ते 40 नागरिकांना विषबाधा तर यामध्ये 6 ते 7 लहान मुलांचा देखील समावेश...

दिलीप कांबळे

मावळ: मावळ Maval तालुक्यातील भडवली गावात काल रात्री काकड आरती समारोप कार्यक्रम पार पडला होता, त्या कार्यक्रमात ग्रामस्थांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. परंतु त्या जेवणातून सुमारे 30 ते 40 जणांना विषबाधा Poisoning झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे देखील पहा-

बाधित रुग्णांना ग्रामीण रुग्णालय काले पवनानगर येथे तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातून विष बाधा झाली आहे. तर काही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यामध्ये सहा ते सात लहान मुलांचा समावेश आहे. रुग्णालयातील तीनही वार्ड फुल झाले असुन काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हेफाटा येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Pune: मावळातील भडवली गावात सार्वजनिक जेवणातून नागरिकांना विषबाधा!
'मी माझ्या बापाचं नाव लावतो.. शाहरुख काय संपुर्ण बॉलिवूड माझं काही बिघडवू शकत नाही'

साधारणतः रुग्णालयात 28 ते 30 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये 5 ते 6 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व बेड फुल झाले आहेत. त्यामुळे काही रुग्णांना ग्रामीण रुग्णलाय कान्हे फाटा येथे पाठवण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com