IPL Betting News: आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी; मुंबई,नागपूरसह दुबईचं कनेक्शन उघड, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Pune crime news: आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या ३ सट्टेबाजांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
IPL Betting News
IPL Betting News Saam Tv

अक्षय बडवे

Pune Crime News: आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या ३ सट्टेबाजांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध पबच्या मालकासह बड्या 'बुकी'चा समावेश आहे. एवढंच नाही तर आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे मुंबई, नागपूरसह थेट दुबईपर्यंत झाल्याचे उघडकीस आले आहे. (Latest Marathi News)

आयपीएल, इंडीयन प्रीमियर लीग म्हणजेच प्रतिभेला संधी मिळवून देणारी क्रिकेट स्पर्धा. याच आयपीएलमुळे कित्येक उभरत्या खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून खेळातील बारकावे शिकण्याची संधी मिळाली. अनेक तरुण खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ मिळालं मात्र या सगळ्यामागे एक विश्व आहे. त्या काळया विश्वाचं नाव म्हणजे 'बेटिंग'

IPL Betting News
Pune Crime News: घरातून जा म्हटल्याने चिडलेल्या घरजावयाने केली सासूला मारहाण; अंगावर ओतले गरम पाणी, पाडले दात

ज्या वर्षीपासून आयपीएल सुरू झालंय त्यापासून ही क्रिकेट स्पर्धा बेटिंगमुळे आधिकच प्रसिद्ध होत गेली आहे. पहिल्या सत्रापासून भारतात अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे मारत शेकडो सट्टेबाजांना अटक केली आहे.

अशीच एक कारवाई पुण्यातील खंडणी विरोधी पथकाने पुण्यात केली आहे. पुणे पोलिसांनी कोंढवा भागातील एका इमारतीत सुरू असलेला सट्टेबाजांचा अड्डा उधळून लावला. यावेळी तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली. याप्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध पब मालक जितेश मेहता याला देखील अटक केली आहे.

याशिवाय या सट्टायातील मुख्य बुकी अक्षय तिवारी जो मध्य प्रदेशात वास्तव्यास आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जितेश मेहता हा पबमालक आहे. इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्याशी मेहताचे लागेबांधे आहेत हे तपासातून समोर आलं आहे.

आरोपींनी सट्टेबाजासाठी तीन इमेल आयडीचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. इंदूरमधील सट्टेबाज तिवारी याचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. इतकचं नाही तर या बेटिंग चे कनेक्शन थेट टर्की, दुबई सारख्या देशात गेलंय. आत्तापर्यंत या आरोपींकडून मोबाईल, डायरी आणि लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेलं आहे.

IPL Betting News
Jalgaon Crime News: भरदिवसा सिनेस्टाईल लुटले; डोळ्यात मिरचीपुड टाकून अडीच लाख लंपास

क्रिकेटचा जागतिक महोत्सव म्हणून आयपीएल कडे पाहिलं जातं मात्र याच खेळामागे वेटिंग सारखं रॅकेट तरुणांना जेलची हवा खायला भाग पाडतय. यामुळे कुठल्याही पैसे कमावण्याच्या मोहाला बळी पडू नका. क्रिकेट हा खेळ आहे खेळाडू म्हणून त्यातून भरपूर शिका आणि प्रेक्षक म्हणून खेळाचा पुरेपूर आनंद लुटा एवढच सांगणे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com