Pune Koyata Gang : आम्ही एरियातील भाई... पुण्यात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ; दुचाकीवरून फिरले, कोयते उगारले अन् पळाले

Pune Crime News : पुण्यातील कोयता गँगचं कंबरडं मोडण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचललेली असतानाच, उत्तमनगर भागात पुन्हा कोयता गँगनं दहशत माजवली.
Pune Koyta Gang
Pune Koyta Gang SAAM TV

Pune Crime News : पुण्यातील कोयता गँगचं कंबरडं मोडण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचललेली असतानाच, उत्तमनगर भागात पुन्हा कोयता गँगनं दहशत माजवली. तिशीच्या आतल्या चौघा तरुणांनी कोयते नाचवले आणि दुचाकीवरून परिसरात फिरून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. कोयता गँगमधील चौघांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पुण्यातील कोयता गँगचा (Pune Koyta Gang) बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत. मात्र, या कोयता गँगचा उपद्रव सुरूच आहे. पुण्यात पुन्हा कोयते बाहेर काढण्यात आले. (Crime News)

दहशत निर्माण करण्यासाठी चार तरुणांनी दुचाकीवरून फिरत हातात कोयते नाचवले. आम्ही एरियातील भाई आहोत, असं मोठमोठ्याने ओरडून सांगत त्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. उत्तमनगर भागात घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. (Crime News)

Pune Koyta Gang
Viral Video : प्रेमी युगुलाचं भान हरपलं; दोघांचा रस्त्यावरच खुल्लम खुल्ला रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

कोयता हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या या चौघा तरूणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चंद्रकांत सुतार (वय ३०), सूरज गायकवाड (वय २२), राहुल धोडगे (वय २८), अथर्व यनपुरे (वय १९) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Pune Koyta Gang
SSC Exam: सोशल मीडियामुळे दहावीच्‍या ९४३ विद्यार्थ्यांचा बुडाला पेपर; फसव्या वेळापत्रकामुळे शैक्षणिक नुकसान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांचे कोणाशी तरी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या चौघांनी मिळून त्या व्यक्तींना शोधण्यासाठी उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसर पिंजून काढले. त्यांनी सोबत आणलेले कोयते बाहेर काढले आणि दुचाकीवरून फिरत परिसरात दहशत माजवली.

"आम्ही या एरियामधील भाई आहोत, कोणी आमच्यामध्ये आलं तर..." असे धमकीच ते देत होते. तसेच परिसरातील काही नागरिकांवरही त्यांनी हे कोयते उगारले. या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील फ्रीजवर पेव्हर ब्लॉक फेकला.

या घटनेमुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही वेळ गोंधळ घातल्यानंतर या चौघांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या तरूणांना अटक केली. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com