Pune Crime News : जिथे दहशत माजवली तिथेच उतरवला माज! धायरीत कोयता गँगच्या गुंडाची पोलिसांकडून धिंड

पुण्यात कोयता गँगची दहशत काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Pune Crime News
Pune Crime News Saam TV

Pune Crime News : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने हैदोस घातला आहे. एकीकडे पोलिस या गँगमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे कोयता गँगची दहशत काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच, पोलिसांनी कोयता गँगमधील तीन सराईत गुंडांना पकडून त्यांची वाजत गाजत धिंड काढली. (Latest Marathi News)

Pune Crime News
Solapur : तिरुपतीला देवदर्शनासाठी गेले, वाटेतच मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात ४ भाविकांचा मृत्यू

कोयता गँगच्या गुंडांनी ज्या परिसरात दहशत (Crime) माजवली त्याच परिसरातून धिंड काढून पोलिसांनी त्यांचा माज उतरवला. मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव अशी या गुंडांची नावे आहेत.

पुण्यातील (Pune) सिंहगड रोड पोलिसांनी अटक करून, धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान या गुंडांची धिंड काढली आहे. धायरीत दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत राजूरकर,सहाय्यक निरीक्षक भरत चंदनशिव,फौजदार निकेतन निंबाळकर, शिपाई अमोल कट्टे, नीलेश खांबे आदींनी पकडले होते.

Pune Crime News
Pune Crime : प्रेमविवाहानंतर चारित्र्यावर संशय; पतीनं ब्लॉक केल्यानं पत्नीनं संपवलं जीवन

कोयता गँगच्या उपद्रव वाढताच

सकाळी आणि सायंकाळी भर गर्दीच्या वेळी अतिशय भरधाव वेगाने, चित्रविचित्र हॉर्न वाजवत वाहने पिटाळणे, वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येत दांडगाई करणे, कोयता, तलवारींचा धाक दाखवून खंडणी मागणे, मनाविरुद्ध वागणाऱ्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरुच आहेत.

अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे आकर्षित झाली आहेत. त्यामुळे नागरिकांसह पोलिस (Police) दलाचीही डोकेदुखी वाढली आहे. अशातच गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या प्रकारांना अटकाव करण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी पोलिस कोयता गँगच्या गुंडांची धिंड काढत आहेत.तरीही गुन्हे कमी होत नसल्यामुळे पोलीस ही चक्रावून गेले आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com