मोठा बोतमी! उदय सामंत गाडी तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसैनिकांना केली अटक

काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे.
uday samant
uday samantsaam tv

पुणे: राज्यात शिवसेना (ShivSena) विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. यावर पुणे पोलिसांनी मध्यरात्री तपास करुन कारवाई सुरू केली आहे, भारती विद्यापीठ पोलिसांत रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे.

उदय सावंत हल्या प्रकरणी कोथरुड पोलिसांत (Police) गुन्हा दाखल नोंद झाला होता. पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरण संजय मोरे यांनी ट्विट केले आहे.

uday samant
'या गद्दारांना लोक...'; उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

शिवसेना (ShivSena) नेते आदित्य ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली, असं ट्विट संजय मोरे यांनी केले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांना अटक केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर,चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांचा समावेश आहे.

uday samant
दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही; सामंतांवरच्या हल्ल्यानंतर CM एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

सामंतांवरच्या हल्ल्यानंतर CM एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

गाडीवर दगड मारून पळून जाणे म्हणजे मर्दुमकी नाही. हा भ्याड हल्ला आहे. कायदा सुव्यवस्था पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. ज्यांनी हे केले आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, चिथावणी देण्याचे काम कोणी करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com