पुण्यात खळबळ! भंगारवाल्याकडे आढळले काडतुसे; पोलिसांची मोठी कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौरा पूर्वी पुणे पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे.
पुण्यात खळबळ! भंगारवाल्याकडे आढळले काडतुसे; पोलिसांची मोठी कारवाई
Pune CrimeSaam tv

पुणे: पुणे पोलिसांनी (Police) एका भंगारवालाच्या दुकानातून ११०५ नग काडतुसे जप्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौरा पूर्वी पुणे पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे १४ जूनला देहू दौऱ्यावर येत असल्याने पुणे पोलिसांनी काल पुणे शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबविला होते.

या ऑपरेशन दरम्यान, गुरुवार पेठेतील एका भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकून पुणे पोलिसांनी जिवंत काडतुसे तसेच आणि काडतुसाचे लीड मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांनी भंगार व्यवसायिक दिनेशकुमार कल्लू सिंग सरोज या आरोपीला ताब्यात घेतल आहे.

Pune Crime
राष्ट्रपती निवडणुकीनंतर महाविकास आघाडी बरखास्त होणार; 'या' भाजप नेत्याने केला दावा

दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज यांच्या दुकानातून ५६ जिवंत काडतुसे, ७९ खराब काडतुसे आणि ९७० बुलेट लीड अशी एकुण ११०५ काडतुसे गुन्हे शाखा पोलीसांनी (Police) जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत १ लाख ६५ हजार ९०० रुपये आहे.

आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणली कुठून ? काडतुसे आणली कशासाठी ? काडतुसे जवळ का बाळगल्या ? यापूर्वी त्याने इतर कोणाला काडतुसे किंवा अग्नी शस्त्रे दिली आहेत काय ? याबाबत पुणे पोलीस दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज कडे सखोल चौकशी करत आहेत. कल्लू सिंग सरोजा उत्तर प्रदेशच्या राहणारा असून त्याला सध्या न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com