पुण्यातील प्राध्यापकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
पुण्यातील प्राध्यापकाची विहिरीत उडी मारून आत्महत्यासागर आव्हाड

पुण्यातील प्राध्यापकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

प्रफुल्ल मेश्राम असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

पुणे - फेसबुकवर Facebook पोस्ट शेअर करत पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने सासवड Saswad येथील विहिरीत Well उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रफुल्ल मेश्राम Prafful Meshram असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

हे देखील पहा -

सासवड पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. प्रफुल्ल मेश्राम हे कमिन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या फेसबुकवर बाय बाय डिप्रेशन, "सॉरी गुड्डी" अशी पोस्ट टाकली होती. त्यानंतर प्रफुल्लने  पुरंदर तालुक्यातील भिवरी गावात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतीमधील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

पुण्यातील प्राध्यापकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या
Bakri Eid: बकरी ईद साजरी करण्याबाबतचे आदेश जारी

पोस्ट पाहून त्यांच्या मित्रांनी शोधाशोध प्रफुल्लची केली. तसेच त्यांनी सासवड पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानुसार प्रफुल्लचा शोध घेत असताना एका विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी,पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल हे काढून ठेवल्याचे दिसून आले. सासवड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांना मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला. मेश्राम यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक आंदाज वर्तविण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com