Rename Pune As Jijapur : पुण्याचे जिजापूर करा; संभाजी ब्रिगेडकडून का होतेय मागणी?

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झाल्यानंतर पुण्याचे जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
Pune Rename Jijapur
Pune Rename JijapurSAAM TV

Pune Rename Jijapur, Sambhaji Brigade : औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता पुण्याच्या नामांतराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पुण्याचे जिजापूर असे नामांतर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं पुन्हा केली आहे.

12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेडनं पुण्याच्या नामांतराची मागणी पुन्हा लावून धरली आहे. पुण्याचे नामांतर जिजापूर करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

पुण्याचे जिजापूर करण्याची का होतेय मागणी?

पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून केली जात आहे. यापूर्वीही संभाजी ब्रिगेडने अनेकदा ही मागणी केली आहे. राजमाता जिजाऊंनी पुन्हा पुणे वसवलं आणि पुणे हे शहर माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे, त्यामुळे जिजापूर हे नामांतर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून होत आहे.

Pune Rename Jijapur
Har Har Mahadev Movie Row : संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ सर्व चित्रपटगृहांत पाडला बंद

पुण्याच्या लाल महालात गर्दी

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पुण्यातील लाल महाल सजवण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील लाल महालात विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. त्यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.

Pune Rename Jijapur
Maratha Reservation: यांच्यासारख्या मराठाद्रोही सरंजामी मराठ्यामुळेच...; तानाजी सावंतांच्या 'त्या' विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com