
पुणेकरांना दहीहंडीचा उत्सव रात्री १० वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकरच्या आदेशाचं पालन करण्यात येईल, असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलंय. पुणे शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत डॉल्बीच्या वापराला बंदी आहे. (Latest News on Dahi Handi)
तर राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुणे शहरात रात्री १० वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आलीय. दरम्यान या उत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरा केली जाते.
मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय.
असा असेल बदल
पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक उद्या संध्याकाळी बदलली जाणार आहे. बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक होणार आहे. मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई अशा रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग वापरावा. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला जाणार्या वाहनांना स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्यानं खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल.
शिवाजीनगरकडे जाणारे प्रवाशी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्याने जाऊ शकतात.
स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपाकडे जाणाऱ्यांनी जंगली महाराज रस्त्यानं झाशी राणी चौकातून डावीकडे जावे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाण्यासाठी बाजीराव रस्त्याने जावे.
रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आलीय. यामुळे पर्यायी मार्ग स्वीकारावा.
लक्ष्मी रस्त्याने सोन्या मारुती चौकाकडून सरळ सेवासदन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलीय.
सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून तुम्हाला इच्छितस्थळी जाता येईल.
शिवाजी रस्त्यावरुन जिजामाता चौकातून गणेश रस्त्यानं दारुवाला पुलाकडे जाण्यासाठी गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक-पवळे चौक- जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गानं तुम्हाला इच्छितस्थळी जाता येईल.
गणेश रस्त्यावरील वाहतूक दारुवाला पूल येथून बंद असणार आहे.
देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल.
यासाठी वाहन चालकांनी अपोलो टॉकीज, नरपतगीर चौक, दारुवाला पूल, दुधभट्टी मार्गाचा वापर करावा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.