Indian Soldier dies : पुण्यातील ३८ वर्षीय जवानाचं मोहिमेला जाताना अपघाती निधन; निवृत्तीनंतरही करत होते देशसेवा

Pune News : पुण्यातील भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात ओझरकर हे वास्तव्यास होते.
Indian Soldier dies
Indian Soldier diesSaam TV

Pune News :

भारतीय सैन्यदलातील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर (वय ३८ वर्ष) यांचं मोहिमेवर जाताना अपघाती निधन झालं आहे. कारगिल ते लेह मोहिमेवर जाताना प्रवासादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुण्यातील भवानी पेठेतील भवानी माता मंदिर परिसरात ओझरकर हे वास्तव्यास होते.

Indian Soldier dies
CCTV Footage : शिक्षक दिनाच्या एक दिवस आधी शिक्षिकेचा अपघाती मृत्यू, कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांवर शोककळा

दिलीप ओझरकर हवालदार पदावरून सैन्यदलातून निवृत्त झाले होते. मात्र त्यांनी पुन्हा कालावधी वाढवून देशसेवा करण्यास पसंती दिली. सराव मोहिमेसाठी जाताना ३ सप्टेंबर रोजी रविवारी दुपारी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यात त्यांचं निधन झालं. (Latest Marathi News)

Indian Soldier dies
Air Hostess Found Dead : उंच भरारी घेण्यासाठी मुंबईत आली नियतीच्या मनात भलतंच होतं; एअर हॉस्टेस तरुणीच्या हत्येचा उलगडा

विमानाने त्यांचे पार्थिव लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे आई, वडील,पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com