Pune Sextortion : अख्खं गाव चालवतंय सेक्सटॉर्शन रॅकेट; पुण्यातील प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन उघड

राज्यात सर्वात जास्त सेक्सट्रोशनच्या घटना पुण्यात
Crime News
Crime Newssaam tv

Pune Crime News : पुण्यात (Pune) दत्तवाडी पोलिसांनी सेक्सटॉर्शन प्रकरणी अन्वर खान या आरोपीला अटक केली.तो मूळचा राज्यस्थानमधील गुरुगोठडी मधील आहे.गुरुगोठडी हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील संपुर्ण गावच सेक्सटॉर्शनचे रॅकेट चालवत असल्याच पोलीस (Pune Police) तपासात उघड झाल आहे.

राज्यात सर्वात जास्त सेक्सट्रोशनच्या घटना पुण्यात घडल्या होत्या.यामध्ये दोघांनी आत्महत्या केल्या होत्या. दोन युवकांना सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या करावी लागल्यानंतर पुणे पोलीसांनी हे सेक्सटॉर्शनचे रॅकेट नक्की कुठून चालते याचा शोध सुरु केला. 

Crime News
Measles Outbreak : मुंबईनंतर आता ठाण्यात सुद्धा गोवरचा शिरकाव; 22 संशयित रुग्ण

मोबाईल नंबरच्या लोकेशनचा माग काढत पुणे पोलीस राजस्थानच्य अल्वर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरु गोठडी गावात पोहचले. या गावातून पोलीसांनी अन्वर खान याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. मात्र पुणे पोलीस पथकाने अन्वर खानला ताब्यात घेऊन तिथुन निघून येण्यात यश मिळवलं.

अन्वर खान याने पुण्यातील दत्तवाडी भागातील 19 वर्षीय मुलाला सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून धमकावल्याने त्याने आत्महत्या केली होती. त्याचबरोबर पुण्यातील धनकवडी भागात एका युवकाने देखील सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केली होती. हे संपुर्ण गुरुगोठडी गावच सेक्सटॉर्शनच्या धंद्यात असल्याच आणि गावातील स्त्री- पुरुष पकडून अडिच हजार लोक यात सहभागी असल्याच पुणे पोलीसांच म्हणणं आहे.

राज्यातल्या सगळ्यात जास्त ऑनलाईन फसवणुकीच्या घटना पुण्यामध्ये घडल्या आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त घटना या सेक्सट्रॉशन केसेस समोर आल्या. त्यामध्ये दोघांना आपला जीवही गमवाव लागला. त्यानंतर आता पोलिसांनी अन्वर खानला अटक केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com