Pune : शिवसैनिकांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट!

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसैनिकांनी गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
Pune : शिवसैनिकांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट!
Pune : शिवसैनिकांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट!SaamTvNews

पुणे : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून काही समाजकंटकांनी पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेचा महाराष्ट्रभरातून निषेध होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी बेळगावमध्ये काढलेल्या मोर्चावर कर्नाटक पोलिसांनी कारवाई केली आहे. "अश्या लहानसहान घटनांवरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही" अशी संतापजनक प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली होती.

आज पुणे दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाले. आज दिवसभर विविध कार्यक्रमांसाठी पुणे शहरात आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन कर्नाटकातील घटनेचा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेजाबदार वक्तव्याचा निषेध नोंदवला.

संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी याबाबत गृहमंत्री शाह यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना राज्य सह-सचिव किरण साळी, नगरसेवक संजय भोसले व गजानन थरकुडे उपस्थित होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.