ST Bus Accident : नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण! एसटी बसची मागची दोन चाके निखळली, अन् थोडक्यात...

Latest News: एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवून बसमधील 35 प्रवाशांचे प्राण वाचले.
Pune ST Bus Accident
Pune ST Bus Accident Saam Tv News

Pune News: पुणे-नाशिक महामार्गावरुन (Pune- Nashik Highway) धावणाऱ्या एसटी बसला (ST Bus) अपघात झाला आहे. या एसटी बसची मागील बाजूची दोन्ही चाकं निखळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे या बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहे. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडीत हा थरार अनेक प्रवाशांनी आज अनुभवलाय. जीव मुठीत ठेवत चालकाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

Pune ST Bus Accident
Weather Update : महाराष्ट्र तापतोय! पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता, घराबाहेर पडताना काळजी घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या परळ येथून ही एसटी बस नारायणगावकडे निघाली होती. या बसमधून 35 प्रवासी प्रवास करत होते. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ अचानक बसची मागच्या बाजूची दोन्ही चाकं निखळली. या बसचे एक चाक पुढे आले तर दुसरे चाक शेजारच्या ओढ्यात जाऊन पडले. ही बस तिरकी होऊन रस्त्यावरच खरडत-खरडत पुढे गेली.

Pune ST Bus Accident
Mumbai News: पार्किंगच्या वादात एअर गन दाखवत धमकावले, घटनेचा धक्कादायक Video व्हायरल; आरोपीला अटक

बसची दोन्ही चाकं निखळल्यानंतर बसचा खालचा भाग घासत गेल्याने मोठ्या ठिणग्या उडाल्या. मात्र एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवून जीव मुठीत ठेवत बसमधील 35 प्रवाशांचे प्राण वाचले. नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचे प्राण वाचले. बस थांबल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाचा गोंगळ कारभार समोर आला आहे. ही एसटी बस डेपोतून बाहेर पडताना तपासण्यात आली नव्हती का? असा सवाल विचारण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com