धक्कादायक! दुपारी बारावीचा ऑनलाइन निकाल पाहिला; युवकाने उचललं टोकाचं पाऊल

पुण्यात बारावीत शिकणाऱ्या निखिलने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन उडी मारत आत्महत्या केली आहे.
nikhil naik
nikhil naik Saam tv

कोथरूड : पुण्यातून (Pune) धक्कादायक बातमी समोर येत आहे. आज बारावीचा निकाल असल्याने राज्यातील बारावीचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून उत्सुक होते, आज त्यांची उत्सुकता संपली. यंदा राज्यात बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण सुरू असताना पुण्यातून धक्कायक घटना समोर आली आहे. पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल (Result) होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. त्यामुळे निखिलने इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन उडी मारत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ( Pune latest News )

nikhil naik
विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू; सह्याद्री स्कूलचे चार शिक्षक निलंबित

मिळालेल्या महितीनुसार, निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर निकालाबाबत तो खूपच उत्सुक होता. दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजले. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. ताण-तणावात त्याने इमारतीच्या वरच्या दिशेने जाऊन वरून उडी मारली. त्यावेळी खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे यांच्या अंगावर पडला.यामध्ये लोणारे गंभीर जखमी झाले. तर निखिलचा जागीच मृत्यू झाला. लोणारे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आई-वडिलांना बसला जबर धक्का

क्रिकेटची आवड असलेल्या निखिलने शरीर सृदृढ ठेवण्यासाठी व्यायाम सुरू केला होता. तो शांत स्वभावाचा होता. निखिलचे वडील आचारीचे काम करतात. तर आई आजूबाजूच्या लोकांच्या घरात जाऊन घरकाम करते. मोठ्या कष्टाने मुलगा निखिलला शिक्षण ते देत होते. मात्र, निखिलच्या जाण्यामुळे त्याच्या आई वडिलांना जबर धक्का बसला आहे.

निखिलच्या जाण्यामुळे पुण्यातील श्रावणधारा वसाहतीमधील महिलांनी दुःख व्यक्त केले. सुरूवातील झोपडपट्टी असलेल्या या जागेत आता चौदा मजली इमारत उभी राहिली आहे. कष्टकरी कुटुंबातील आशेचा किरण असलेला तरूण मुलगा गेल्याने परिसरातील सर्वच महिलांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इमारतीला जाळी बसवण्याची मागणी

याच इमारतीमधून सहा महिन्यापूर्वी एक पाच वर्षाचे बाळाचा पडून मृत्यू झाला होता. इमारतीला सुरक्षा जाळी असती तर हे जीव वाचले असते. त्यामुळे मोठ्या इमारतीमध्ये सुरक्षा जाळ्या लावा अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com