Pune: मुख्यमंत्र्यांच्या नावाने उभारलेल्या वादग्रस्त उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द

माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्वखर्चाने उभारलेले नामदार एकनाथ साहेब शिंदे उद्यानाचे लोकार्पण सोहळा आज आयोजित केला होता.
Pune Eknath Shinde News
Pune Eknath Shinde NewsSaam TV

सचिन जाधव -

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत यावेळी ते माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्वखर्चातून बांधलेल्या नामदार एकनाथ भाई शिंदे उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार होते. मात्र, आता त्या उद्यानाचं उद्घाटन कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे.

प्रशासकीय मान्यता नसल्याने हा उदघाटनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. तसंच या उद्यानाचं नाव देखील आता काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हे केवळ नागरिकांना भेटून पाहणी करून जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज पुणे शहरांमध्ये दिवसभर कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांच्या शुभहस्ते शिवसेना (Shivsena) पुणे शहराध्यक्ष माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे (corporator Pramod Nana Bhangire) यांच्या विकास निधीतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) फुटबॉल मैदानाचे लोकार्पण सोहळा तसेच नाना भानगिरे यांनी स्वखर्चाने उभारलेले नामदार एकनाथ साहेब शिंदे उद्यानाचे लोकार्पण सोहळा आयोजित केला होता.

पाहा व्हिडीओ -

मात्र, शिंदेच्या उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत ते नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आल आहे. शिवसेनेचे शिंदे समर्थक माजी नगरसेवक भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं आहे.

उद्यानाची जागा महापालिकेची (PMC) असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती असही त्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी या नामकरनाला प्रशासकीय मान्यता नाहीये. परिणामी आजचा उद्घाटन सोहळा वादात सापडला होता.

Pune Eknath Shinde News
...त्यामुळे ठाकरेंनीच आमदारकीचा राजीनामा द्यावा; शहाजी बापू पाटील यांचा हल्लाबोल

महत्वाचं म्हणजे याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाबाबतही प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्या महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. महापालिकेच्या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित होणे अपेक्षित आहे. मात्र माजी नगरसेवक भानगिरे यांनी स्वतः च दोन्ही कार्यक्रमांचा आयोजन केलं होतं त्यामुळे त्यावर टीका होत होती अशातच आता त्या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com