Pune: ED ने जप्त केलेल्या D. S. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी

अटकेनंतर ईडी कडून जप्त केलेल्या डी एस कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Pune: ED ने जप्त केलेल्या D. S. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी
Pune: ED ने जप्त केलेल्या D. S. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरीSaam Tv

सागर आव्हाड

पुणे : अनेक गुंतवणुकदारांची कोट्यवधीची फसवणुक Scam केल्याप्रकरणी गेल्या 4 वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक Builder डी.एस.कुलकर्णी D.S. Kulkarni हे तुरूंगात Jail आहेत. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर ईडी कडून जप्त केलेल्या डी एस कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी Chatushrungi Police Pune पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

हे देखील पहा-

डी. एस कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी मंदिराच्या जवळ सुमारे 40 हजार चौरस फुट एवढ बांधकाम असलेला सप्तशृंगी हा बंगला 2006 रोजी बांधण्यात आला होता. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बंगलाही ईडीने जप्त केला होता. तेव्हापासून तो बांगला बंदच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरीचा हा प्रकार 16 ऑक्टोबर 2019 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला आहे. ED ने सील केलेल्या चतुर्श्रुंगी येथील आलिशान बंगल्यात चोरट्यांनी सहा लाखांचा ऐवज चोरी केला आहे.

Pune: ED ने जप्त केलेल्या D. S. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी
Pune: महाविद्यालयं, विद्यापीठं आणि पर्यटन स्थळे आजपासून खुली

चोरट्यांनी D. S. कुलकर्णी यांच्या बंगल्याचे सील तोडून आठ LED टीव्ही, संगणक, 3 सीडी प्लेअर,लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदीच्या वस्तू, कॅमेरा, पिठाची गिरणी अश्या वस्तूंवर आपला डल्ला मारला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.