मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पुन्हा खुली; प्रशासनाकडून जमाबंदीचा आदेश मागे

जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे
Travelling plan, Travelling spots, Pune, Monsoon plan
Travelling plan, Travelling spots, Pune, Monsoon planब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : तुम्ही जर पावसाळ्यात पर्यटनस्थळी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लवकरच तुम्हाला पावसाळी वातावरणाचा मनमुराद आनंद लुटता येईल. कारण, पुणे जिल्ह्यातील पर्यंटनस्थळावर लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे. पावसाचा जोर ओसरल्याने लागू केलेला आदेश जिल्हा प्रशासनाने मागे घेतला आहे. (Pune Latest News)

Travelling plan, Travelling spots, Pune, Monsoon plan
शरद पवारांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त

गेल्या आठवड्यात राज्यासह पुणे परिसरात मुळधार पाऊस झाला. सलग पाच ते सहा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच हवामान विभागाने जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 13 जुलै रोजी जमावबंदीचे आदेश दिले होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, म्हणून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास आणि पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

Travelling plan, Travelling spots, Pune, Monsoon plan
मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक; दूरदर्शनला पत्र पाठवून केली 'ही' मागणी

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह पुणे विभागात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे हा आदेश मागे घेण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी, तुम्ही नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटन स्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल आणि त्या ठिकाणी पाऊस, दाट धुके असेल, तर स्थानिक गावातील एखादा मार्गदर्शक सोबत न्यावा. असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com