Pune: ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; दोन्ही वाहने दरीत कोसळली

वरंधा घाटात अपघातात लहान मुलीसह तिघेजण जखमी
Pune: ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; दोन्ही वाहने दरीत कोसळली
Pune: ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; दोन्ही वाहने दरीत कोसळली सागर आव्हाड

सागर आव्हाड

पुणे: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील महाडच्या बाजूला वरंध गावाजवळील नागमोड्या वळणावर ट्रकची पीकअप जीपला धडक झाली आहे. या अपघातात 6 वर्षाच्या लहान मुलीसह तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वरंध गावच्या ग्रामस्थांनी गाड्यांमध्ये अडकलेल्या बाहेर काढले आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेले तिघेही भोरचे Bhor आहेत. जखमींना महाडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Pune: ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; दोन्ही वाहने दरीत कोसळली
Beed: परळीत पंकजा मुंडेंचा गरबा... (पहा व्हिडीओ)

मिळालेल्या माहितीनुसार, एक पीकअक जीप महाडवरून भोरला येत होती. त्यावेळी वरंध गावाजवळील नागमोडी वळणावर भोर बाजूकडून आलेला ट्रक (क्रमांक एम एच 12 एफ सी 8199) हा वंरधा घाटतून महाडच्या बाजूला घाट उतरत होता. त्याचवेळेस ट्रकने समोरून येत जीपला धडक दिली. यामुळे दोन्हीही वाहने खोल दरीत कोसळली आहेत. अपघाताचा आवाज आल्यामुळे वरंध गावातील ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये पीकअप जीपमधील चालक आणि त्याची 6 वर्षांची मुलगी व ट्रकचालक या तीघांनाही ग्रामस्थांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले आहे .

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.