Pune University News: पुणे विद्यापीठाला लवकरच लाभणार पूर्णवेळ कुलगुरू; आता कोण धुरा सांभाळणार?

पुणे विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू
pune university
pune universitySaam Tv

सचिन जाधव

Pune News Today: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लवकरच पूर्णवेळ कुलगुरू लाभण्याची शक्‍यता आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीने २७ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर पाच नावे निश्चित करून राज्यपाल कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड आज राज्यपालांकडून करण्यात येणार आहे. या पाच नावांतून एक नाव कुलगुरू म्हणून आज संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येईल. (Latest Marathi News)

pune university
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: तोंडात बोळा कोंबून बाळ झुडुपात फेकलं; भयंकर घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं

कुलगुरू पदासाठी चर्चेत असलेल्या दोन ते तीन नावांवर निवडीआधीच प्राध्यापक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे कोणाला कुलगुरुपद मिळतं याकडे लक्ष लागलंय. पुणे विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदाचा कार्यकाळ डॉ.नितीन करमळकर यांनी पूर्ण केल्‍यानंतर सध्या प्रा.डॉ.कारभारी काळे यांच्‍याकडे कुलगुरुपदाची प्रभारी जबाबदारी आहे. (Pune News)

राज्‍यभरातील पारंपारिक विद्यापीठाच्‍या कुलगुरू निवडीची प्रक्रिया मंदावलेली होती.अखेर या प्रक्रियेला गती मिळालेली असून, पुणे (Pune) विद्यापीठाच्‍या कुलगुरू निवडीसाठी प्रक्रियादेखील गतिमान झालेली आहे.

pune university
Guyana school fire: बापरे! शिक्षकांनी मोबाईल जप्त केल्याचा राग; मुलीने अख्ख्या शाळेलाच लावली आग, २० जणांचा होरपळून मृत्यू

पुणे विद्यापीठाची संभाव्य नावं

डॉ. पराग काळकर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता

प्रा. अविनाश कुंभार - विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग

डॉ.संजय ढोले - भौतिकशास्त्र विभाग

प्रा. सुरेश गोसावी - पर्यावरण शास्त्र विभाग

डॉ. विजय फुलारी - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com