Pune News
Pune News Saam TV

Pune Water Crises : पुणेकरांची चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ

Pune Water Crises: खडकवासला धरण साखळीमधील चारही धरणामध्ये 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Pune News: पुण्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस पुणेकरांची चिंता वाढवत आहे. पुणेकरांना जून महिन्यात पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी महापालिकेने शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद करण्याचा निणर्य घेतला आहे.

मात्र मान्सून वेळेत दाखल न झाल्यास पुण्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा तळ गाठत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमधील चारही धरणामध्ये 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील इतर 13 धरणात देखील पाणीसाठा कमी आहे. (Pune News)

Pune News
Police Bharti 2023: पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्या; नाना पटोलेंच CM शिंदेंना पत्र

महत्त्वाच्या धरणांमधील शिल्लक पाणीसाठा

>> टेमघर - 0.19 टीएमसी

>> वरसगाव -4.61 टीएमसी

>> पानशेत -1.83 टीएमसी

>> खडकवासला -1.05 टीएमसी (Latest News)

Pune News
Mumbai Police Heart Attack: आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्ताच्या तणावामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला हृदयविकाराचा झटका

रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे महापालिकेने शहरात 'रोटेशन' पद्धतीने शहरातील विविध भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. येत्या कालपासून म्हणजे 25 मे पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com