Ajit Pawar: पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार? अजित पवार महत्त्वाची बैठक घेणार

पुण्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज कालवा समितीची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बैठक घेणार आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

पुणे : पुण्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज कालवा समितीची उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) बैठक घेणार आहेत. आजच्या बैठकीत पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाण्याची शक्यता आहे (Pune Water Issue Deputy CM Ajit Pawar will take meeting of kalva committee).

Ajit Pawar
Clean Pune: पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाला 17 टीएमसी पाण्याची मागणी केलीये. सध्या पालिकेला 11 टीएमसी एवढाच पाणीसाठा मंजूर आहे. शहराला नव्याने 2.60 टीएमसी पाणी भामा आसखेड धरणातून देण्यात आलाय. त्यामुळे 2.60 टीएमसी पाणी खडकवासला धरणातून कमी करा, असंही जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे.

Ajit Pawar
पुण्यात नवे निर्बंध? पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक

23 गावांचा समावेश पाहता अतिरीक्त पाण्याची मागणी महापालिका करत आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिका विरुद्ध जलसंपदा विभाग असा संघर्ष पाहायला मिळतोय. आज अजित पवार (Ajit Pawar) बैठकीत काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागून आहे. दुपारी 2.30 वाजता अजित पवार कालवा सल्लागार समितीची बैठक घेणार आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com