धबधब्याच्या पाण्यावर होणार वीजनिर्मिती

ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन तरुण एकत्र येत मिशन ऊर्जा हा प्रकल्प पुणे जिल्हयात राबवित आहेत.
धबधब्याच्या पाण्यावर होणार वीजनिर्मिती
धबधब्याच्या पाण्यावर होणार वीजनिर्मितीसागर आव्हाड

पुणे - दुर्गम भागात वीज नसल्याने नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होतात .याकरता राज्यात पहिल्यादांच दुर्गम भागातील गावांना तिथल्याच नैसर्गिक असलेल्या धबधब्याच्या माध्यमातुन वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या करता ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन तरुण एकत्र येत मिशन ऊर्जा हा प्रकल्प पुणे जिल्हयात राबवित आहेत. राज्यातील दुर्गम भागातील गावे ही आजही अंधारात आहेत. ज्या ठिकाणी वीज आहे, त्या ठिकाणी वीजपुरवठा नियमित होत नाही.

हे देखील पहा -

पुण्यातील भोर, वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागांतील गावांना ऊर्जेबाबात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काही ध्येयवेड्या तरुणांनी 'मिशन ऊर्जा उपक्रम हाती घेतला आहे. पुणे जिल्हा परिषद ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, पर्सिस्टंट फाउंडेशन, किर्लोस्कर ब्रदर्स यांच्या सहकार्यातुन हा प्रकल्प उभा राहत आहेत नुकतच या प्रकल्पाचे भुमीपुजन करण्यात आले.यावेळी गावचे सरपंच,ग्रामस्थ ,पदाधिकारी उपस्थित होते.

धबधब्याच्या पाण्यावर होणार वीजनिर्मिती
बीडचं आराध्य दैवत अंबाजोगाईची योगेश्वरी माता...शेकडो वर्षाचा इतिहास आणि परंपरा

भोर, वेल्हा तालुक्यांतील ६ तर सातारा जिल्ह्यातील ४ गावात येत्या वर्षात हा प्रकल्प साकारणार आहे. धबधब्याचे पाणी एका साठवण तलावात साठवून या पाण्यावर सात ते आठ महिने वीजनिर्मिती केली जाणार आहे. एका प्रकल्पातून वर्षभरात १६ ते २२ हजार किलोवॅट वीजनिर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. प्रकल्पाचा शास्त्रीय अभ्यास, तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रशासकीय परवानगी देखील मिळाल्या आहेत. वेल्हे तालुक्यातील घेवंडे, गेळगाणी,धोपेखिंड ही गावे तर चांदवणे या भोर तालुक्यातील गावात हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.अशी माहिती ट्री इनोव्हेटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष तन्वीर इनामदार यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.