Pune Air Quality: पुणेकरांनो काळजी घ्या; हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट स्तरावर...

Pune Air Quality: सर्वाधिक प्रदूषित शहर मानल्या जाणाऱ्या दिल्ली येथील हवेच्या गुणवत्तेपेक्षाही पुण्याच्या हवेची गुणवत्ता अधिक वाईट स्तरावर पोहोचली आहे.
Pune Polluted Air Quality
Pune Polluted Air QualitySaam Tv

पुणे: सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील (Pune) हवेची गुणवत्ता (Air Quality) अत्यंत वाईट स्तरावर असल्याची नोंद झाली आहे. आयआयटीएम-सफर संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, पुण्यातील हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 193 प्रतिघनमीटर इतके होते, तर पीएम 2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 111 प्रतिघनमीटर इतके नोंदविण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Central Pollution Control Board) दिलेल्या मानकानुसार हे प्रमाण अनुक्रमे 100 आणि 80 प्रतिघनमीटर असणे अपेक्षित आहे. (Punekars beware; Extremely poor air quality )

हे देेखील पहा -

यामध्ये भूमकर चौक आणि लोहगाव येथे हवेची गुणवत्ता (Air Quality) सर्वाधिक वाईट स्तरावर आहे. तर पाषाण, शिवाजीनगर, कात्रज आणि भोसरी या भागांमध्येही हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचली आहे. वाढत्या पीएम प्रदूषकामुळे पुण्यातील हवेची गुणवत्ता सर्वाधिक प्रदूषित (Air Pollution) शहर मानल्या जाणाऱ्या दिल्ली येथील हवेच्या गुणवत्तेपेक्षाही अधिक वाईट स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळे ऐन कोविडच्या काळात नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. यासाठी घरातून निघताना मास्क वापरण्याच्या सल्ला देण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com