Pune Water Supply: पाणी जपून वापरा! पुण्यात ४ ऑगस्टला 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Supply Updates |५ ऑगस्टला पाणीपुरवठा उशीरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
Pune Water Supply Updates
Pune Water Supply UpdatesSaam TV

सचिन जाधव

पुणे: पुणे महानगरपालिकेने (PMC) नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे. ४ ऑगस्टला पुण्यातला (Pune) काही भागात पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे, तर ५ ऑगस्टला पाणीपुरवठा उशीरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. महावितरणच्या कामासाठी आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद असणार आहे, त्यामुळे येत्या ३ तारखेलाच पाणीसाठा करुन ठेवण्याचे आणि पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना महापालिकेने केला आहे. (Pune Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिनांक ४ ऑगस्टला महाराष्ट्र राज्य वीज वितरण आणि पारेषन कंपनीच्या कामासाठी तसेच पर्वती जलकेंद्र आणि लष्कर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक, स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याकारणामुळे पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ५ ऑगस्टला सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग) : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

Pune Water Supply Updates
MNS : अमित ठाकरे इन अॅक्शन मोड; तरुणाईला साद घालण्यासाठी मनविसेचे अनेक युनिट सक्रिय

लष्कर जलकेंद्र भाग : लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, रस्ता, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com