
पुणे : काही दिवसांपूर्वी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याचा ‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा बॉक्स ऑफसवर चांगलाच गाजला होता. बॉक्स ऑफिससह सोशल मीडियावर या सिनेमाची चलती होती. यातले काही डायलॉग, सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग होती. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने असा धमाका केला आहे, की तो आता लोकांच्या मनातून सहजासहजी बाहेर पडत नाही. मात्र, पुण्यात पुष्पा चित्रपटातील गाणं म्हणणं तरुणाच्या चांगलच अंगलट आलं आहे. महिलांकडे बघत 'तेरी झलक शर्फी' हे गाणे म्हणणाऱ्या तरुणावर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News in Marathi)
स्वप्निल अरुण वांजळे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निल हा पुण्यातील वारजे माळवाडीतील रायगड कॉलनी परिसरात राहतो. मंगळवारी (9 मे) दुपारच्या सुमारास तो आपल्या परिसरात उभा असताना तेथून फिर्यादी महिला भाजी घेऊन घरी जात होत्या. त्याचवेळी स्वप्निल याने फिर्यादी महिलांकडे बघून पुष्पा चित्रपटातील 'तेरी झलक शर्फी' हे गाणं म्हणत हातवारे करत इशारे केले. हे कृत्य लज्जास्पद असल्याने फिर्यादी महिलांनी त्याला जाब विचारला.
मात्र, फिर्यादी महिलांकडे बघून तरीही तो गाणं म्हणतच राहिला. अखेर या महिलांनी वारजे पोलीस ठाणे गाठत सदरील तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. फिर्यादी महिलांचा तक्रारीनंतर वारजे पोलिसांनी आरोपी स्वप्निल वांजळे यांच्या विरोधात कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.