भरधाव दुचाकीची दाम्पत्याला धडक; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, चालकाला अटक

भरधाव वेगानं येणाऱ्या दुचाकीनं एका दाम्पत्याला जोरदार धडक दिली.
भरधाव दुचाकीची दाम्पत्याला धडक; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, चालकाला अटक
culprit arrestedsaam tv

उल्हासनगर : भरधाव वेगानं येणाऱ्या दुचाकीने (Ulhasnagar Accident) एका दाम्पत्याला जोरदार धडक दिल्याची दुर्देवी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या अपघातात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. राधा सिंग असं मृत (Radha Singh Died) महिलेचं नाव आहे. तर मृत महिलेचा पती गोकुलसिंग जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर दुचाकीचा चालक करन काली लबाना तेथून पसार झा होता. त्यानंतर सीसीटीव्हीत फुटेजच्या आधारे हिललाईन पोलिसांनी (Hill Line Police) फरार झालेल्या करन काली लबानाला अटक केली.

culprit arrested
IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी धक्का; दिग्गज खेळाडू रुग्णालयात दाखल

याबाबत सविस्तर वृत्त असं की, 18 मार्चला डोंबिवलीत राहणारे गोकुळ सिंग आणि राधा सिंग उल्हासनगरात नातेवाईकांकडे आले होते.त्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारास घरी परतत असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने दोघांना धडक दिली. ही घटना कॅम्प क्रमांक पाच येथील लाल साई गार्डन तीन बंगल्याजवळ घडली. अपघात झाल्यानंतर राधा सिंगचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गोकुलसिंग जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर चालक करन काली लबाना फरार झाला होता. त्यानंतर शनिवारी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत हिललाईन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुभाष घाडगे यांनी करन काली लबाना याला अटक केली.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.